चांदूरबाजार येथील टोंगलापूर फाट्याजवळ एक मोठी दुर्घटना टळली. परतवाडा येथून चांदूरबाजारकडे येणाऱ्या MH 27 Y 4147 क्रमांकाच्या डंपर ट्रकला अचानक आग लागली. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य सचिन हिवराडे यांनी प्रसंगावधान दाखवत तात्काळ ट्रक चालकाला सुरक्षित बाहेर काढले.
यानंतर त्यांनी पोलिस व अग्निशमन दलाला माहिती दिली. पोलिस, अग्निशमन दल आणि गावकऱ्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. सचिन हिवराडे यांच्या तत्परतेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
न्यूज G9 महाराष्ट्रासाठी
चांदूरबाजार प्रतिनिधी – दिनेश गोहत्रे
#Chandurbazar #SachinHivrale #TruckFire #BreakingNews #NewsG9Maharashtra #AmravatiNews #MaharashtraNews #ViralNews

